Anushree Dhabekar

Classics Inspirational

3  

Anushree Dhabekar

Classics Inspirational

आठवणीतील दिवाळी

आठवणीतील दिवाळी

2 mins
204


माझ्या आठवणीतील दिवाळी ही लग्नानंतरची आहे. नवीन नवरी माहेरी जाण्याची ओढ ही असतेच पण घरी पाहुणे येणार आहे तर सूनेला सासरी राहणे आवश्यक. करायचे काय? जीव गुंतला असतो माहेरी,तर सहाजिकच थोडी चिडचिड झाली. अगोदरच जाऊने माहेरी निरोप दिला भाऊबीज झाल्याशिवाय अनुश्री माहेरी येणार नाही. आई बाबा थोडे नाराज झाले पण सासरी अगोदर तिचा हक्क म्हणून त्यांनी स्वतःला समजावले.


लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मी छान शालू घालून तयार झाली पण उद्या मला गावाला जाता येणार नाही म्हणून थोडी हिरमुसून होती. माझी जाऊ मला म्हणाली अनुश्री माहेरपण आता थोडे दूर ठेवायचे आणि इकडच्या नातेवाईकाकडे लक्ष द्यायचे. मी चेहरा पाडून तिला हो म्हणाली आणि लक्ष्मीपूजन साजरी केली.


रात्री तर माझ्या डोळ्यात पाणीचं येत होतं. सर्व जाऊबाईचे चालते. ती म्हणाली असती जा गावाला तर भाऊ न्यायला आला असता. स्वतःच्या विचारात मी रात्र घालवली. सकाळी सर्वजण छान हसत होते मला तर रडूच यालं. पण बोलू शकली नाही. आणि दहा वाजता दारात भाऊ ऊभा झाला मी माझ्या रूम मध्ये होती. जाऊने खालूनच आवाज दिला. अनुश्री पाहुणे आले खाली ये..


मी नाक मुरसत खाली जाण्यास डोक्यावर पदर घेतला. चेहरा आरश्यात बघितला आणि पायरीने उतरत होती. मला कोणीच दिसत नव्हते. 


मी समोरच्या रूम मध्ये गेली."ताई पाहुणे आजच आले."

"अग हो. पाय धुआयला पाणी नाही देशील?"

 मी तांब्या भरला आणि इकडे तिकडे पाहीले. "ताई पाहुण्यांची बॅग दिसत नाही. खरच पाहुणे आले का? तुम्ही माझी थट्टा करत आहात?"


तर माझा भाऊ माझ्या मागे उभा होता आणि जाऊ समोर ऊभी राहून हसत होती. पायरीवर नवरा बसून हसत होता.


जाऊने माझ्या हातातील तांब्या घेतला आणि मला वळवले.

"अंकुश तू. कधी आला?" मी रडतच म्हणाली 


"कसं वाटलं अनु सरप्राईज." अशी म्हणून तिने माझ्या डोळ्यातील अश्रू पुसले.


"ताई."म्हणून मी तिला मिठी मारली.

"अग मी काल फोन करून सांगीतले उद्या अनुश्रीला माहेरची पहिली दिवाळी करायला घेऊन जा."


"तुम्ही अगोदर का सांगीतल्या नाही."

"अग,मला आज तुझ्या चेहर्‍यावरचा आनंद पाहायचा होता. म्हणून अंकुश ने सुध्दा काहीच सांगीतले नाही. अनुश्री आपण दोघी एकमेकींना सांभाळून घ्यायचे. तू तयारीला लाग मी स्वयंपाक करते. आणि एक आठवड्याने न्यायला येणार तोपर्यंत राहशील ना माहेरी."

मी लाजून पायरीने धावत गेली तर ती म्हणाली "अगं हळू, पायऱ्या कशी भरभर चढते." 


खूप आठवणी आहे पण ही आठवण मला नेहमीच दिवाळीत येते. आज तिच्या फक्त आठवणी माझ्यासोबत आहे. एक जाऊपेक्षा माझी मैत्रिण, माझी जीवलग होती. तिने प्रत्येकक्षणी गोड आठवणी दिल्या. मला लहान बहीण म्हणून सांभाळून घेतली.


आय लव्ह यू जाऊबाई, आणि मिस यू. तुझी जागा आजही माझ्या हृदयात तशीच आहे.



Rate this content
Log in

Similar marathi story from Classics