Anushree Dhabekar

Fantasy Inspirational

3  

Anushree Dhabekar

Fantasy Inspirational

मायेची सावली (अनामिक नात)

मायेची सावली (अनामिक नात)

4 mins
10


सुधा मावशी आणि आनंद काका यांचे शहराच्या बाहेर मुख्य रोडला लागून लहानशे हाॅटेल. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा. खाली हाॅटेल आणि वरच्या मजल्यावर ते राहत होते. आजूबाजूस खूप मोठी वस्ती नव्हती. सरकारी कार्यालये आजूबाजूस होती म्हणून काकाने लहानशी जागा घेऊन तिथे चहा, पान आणि थोडाफार नाश्ता ठेवून हाॅटेल चालू केले. 


त्यांच्या हाॅटेलच्या मागे थोड्या अंतरावर बंगाली लोकाची वस्ती होती. मावशी मराठी म्हणून ती सहसा तिकडे कधी जात नव्हती. तिन्ही मुले लहान. ती घरचे करून काकाला हाॅटेलात मदत करायची.


शुक्रवारचा दिवस एक वयस्क बाबा हाॅटेलात आले. चहा आणि एक बिस्किट पुडा ऑर्डर देऊन एका खुर्चीवर बसले. सुधा, चहा आणि बिस्किट पुडा घेऊन बाबाकडे गेली. टेबलवर चहा ठेवून बिस्किट पुडा देतांना म्हणाली "बाबा चहा आणि बिस्किट घ्या."


"बाबा" या शब्दावर तो स्मित हसला आणि बिस्किट पुडा हातात घेतला. सुधा, क्षणभर त्याच्याकडे पाहून ती आनंदला मदत करण्यास गेली. बाबा चहा बिस्किट खायला लागला


बाबा चहा बिस्किट खाऊन तिथेच बसून राहीला. हळूहळू संध्याकाळ झाली. पण बाबा ऊठला नाही. सुधा, दिवेवात करून बाबाजवळ आली. "बाबा अजूनपर्यंत इथेच आहात? थोड्याच वेळात हाॅटेल बंद होणार."


"हा बेटा जाणा तो पडेगा।" म्हणून बाबाने चप्पल घातली आणि

सुधाच्या हातात दहा रूपये देण्यास गेले तर त्यांना चक्कर आली. सुधाने आनंदला आवाज दिला. आनंद आधार देऊन त्यांना खुर्चीवर बसवतो. "सुधा ताप आहे यांना. दवाखान्यात घेऊन जाऊ का? वयस्क आहे औषधपाणी करून पाठवू."


पण सुधाचं मन तयार नव्हतं कारण ते मुसलमान होते शिवाय अपरिचित. कुठून आले, कुठे जाणार हे सुध्दा माहित नव्हते तरी माणुसकीच्या नात्याने आनंदला दवाखान्यात घेऊन जाण्यास तिने परवानगी दिली.


आनंद, बाबाला दवाखान्यात घेऊन गेला. डाॅक्टरने सांगीतले खूप कमज़ोरी आहे सलाईन लावावी लागणार. एक रात्र दवाखान्यात भर्ती करा. आनंदने त्यांना भर्ती केले. एक रात्र तो त्यांच्या जवळ राहीला. सकाळीच डाॅक्टर ने औषध गोळ्या देऊन रजा दिली.


आनंद, बाबाला घरी घेऊन आला. सुधा ने नाश्ता बनविला आणि प्लेट मध्ये घेऊन त्यांच्याकडे गेली. "बाबा थोडं खाऊन घ्या नंतर गोळ्या देते."


आनंद बाबा जवळ बसला. "बाबा तुम्हाला कुठे जायचे आहे? पत्ता आहे का? मी फोन करुन घरच्यांना तुमच्याबद्दल कळवतो."


"नही बेटा मै चला जाऊंगा। तुम्हे तकलीफ नही होंगी।"

"बाबा तुम्ही कुठे जाणार आहात ते तरी सांगा." आनंद म्हणताच ते म्हणाले "अल्ला के दरबार मे।"


सुधा समजली हे घरून निघून आले आहे. बहुतेक इकडे तिकडे भटकत जीवन जगत आहे. ती कोणताही विचार न करता बाबाला म्हणाली. "बाबा इथेच राहा. तुमची इच्छा जोपर्यंत होणार नाही घरी जायची तोपर्यंत आमच्या सोबत रहा. पण चटणी भाकर या पोरीच्या घरी मिळणार."


"बेटी मेरा गुजरा हुआ कल मालूम होगा, तो तुम मुझे अपने आस-पास नही रखोगी।"


"बाबा नका सांगू काहीच. आम्हाला इथे तुमचा आधार वाटणार. मुलांना खेळायला आजोबा मिळणार."


सुधा ने म्हटले तर ते राहायला तयार झाले पण त्यांचे मन त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. 


आठ दिवसांनी बाबाने खूप हिम्मत करून सांगीतले. "मी जेल मधून शिक्षा भोगून आलो आहो. ज्या मुलाचा गुन्हा मी माझ्या अंगावर घेतला त्या मुलानेच मला स्विकारले नाही. बायको, मुली, जावई, सुना आता यांना मी एक गुन्हेगार वाटतो. पण माझे कूठे चुकले. मुलाला वाचवण्यासाठी एक बाप समोर उभा झाला पण आज त्याच मुलाने घराचे दरवाजे बंद केले." हे सांगून बाबा रडायला लागले.


ऐकून आनंद आणि सुधा सुन्न झाले. बाबाच्या डोळ्यात त्यांना सत्य दिसले त्यांनी आपल्या जवळ ठेवले. कधीच त्यांना गुन्हेगार मानायचे नाही.


सुधाने आनंदला बाबाच्या कुटुंबाचा पत्ता काढायला सांगीतले. 

त्यांना समजले पाहीजे बाबा आपल्याकडे आहे.


आनंद ने तपास काढला. बाबाचे कुटुंब मोठ्या शहरात आणि श्रीमंत आहे. त्यांनी खरच मुलाचा गुन्हा आपल्या अंगावर घेऊन शिक्षा भोगली. हे त्यांना तिराहीत कडून समजले. त्यानंतर आनंद कधीच बाबाच्या कुटुंबाला भेटायला गेले नाही आणि बाबाला ही काहीच सांगीतले नाही.


 आनंदला आणि सुधाला सुध्दा मुसलमान बाबाचा अभिमान वाटत होता. बाबा त्यांच्या कुटुंबातील एक आधारस्तंभ बनले.


बाबा सुधाला आपली मुलगी माणायचे. तिच्या मुलांना शाळेत नेऊन देने. त्यांचा अभ्यास घने, कधी कधी तर हाॅटेल मध्ये मदत करायचे. सुधाला ते खूप जपायचे. सुधा, हिंदु आणि बाबा मुसलमान. बाबाने आपला धर्म पाळला. रोज नमाज पढायला जवळच्या दर्ग्यात जायचे. सुधाने कधीच त्यांना त्याच्या धर्मापासून दूर केले नाही.


सुधाच्या घरी जसा गणपती, नवरात्रोत्सव होत होते तसेच रमजानचा महिना आणि ईद सुध्दा साजरी होत होती. एकाच छताखाली राम आणि रहिम दिसले. आजूबाजूस आनंदचे नाव आणि भरभराट झाली. दिवसामागून दिवस जात होते.

पाहता पाहता आनंदची मोठी मुलगी टिचर आणि मुलगा इंजिनिअर झाला आणि लहान मुलगी दहावीत होती.


बाबा खूप थकले. सुधाने तर जन्मदात्या बाबाची सेवा करावी तशीच त्यांची सेवा केली. एक दिवस बाबाने हे राम म्हणून प्राण सोडला. 


सगळीकडे शोकांतिका पसरली. सुधाच्या माहेरचे आणि आनंदचे नातेवाईक आले. बाबा मुसलमान होते म्हणून आनंदने त्यांची अंत्ययात्रा दर्ग्यातून पूर्ण त्यांच्या विधीनुसार केली. आनंदने बाबाला मुलगा म्हणून माती दिली. 


सुधा आणि आनंदसोबत बाबाचे रक्ताचे नाते नव्हते तरी एक अनामिक नात्याच्या आधारात तिला वटवृक्षाची सावली मिळाली होती.


ज्याने जेलमध्ये शिक्षा भोगली त्यानेच सुधाच्या मुलांवर योग्य संस्कार लावले. सुधाने बाबाला आधार दिला, तर बाबाने सुधाला 

वटवृक्षाची सावली दिली. आजही आनंदचे कुटुंब त्या सावलीला हृदयात जपून ठेवली आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy