आठवणीत तुझ्या....
आठवणीत तुझ्या....


आज आठवणीत तुझ्या,
चिंबचिंब भिजली होती....
डोळे उघडुन बघीतले तर,
कुशीत तुझ्या निजली होती।।१।।
आज तो चमकणारा चंद्रही,
किती मिळता जुळता होता....
तुझ्यासारखा सुंदर आणि,
माझ्या सारखा एकटा होता।।२।।
आज पावसाची सर ही,
माझ्यावर हसत होती.....
किती शोधशील त्याला,
कानात येवुन म्हणत होती।।३।।
आज तुझा श्वास स्वप्नात,
माझ्या भेटला होता......
तुझाच आहे ग...! मी वेडु,
हळुच मला म्हणत होता।।४।।
आज वेडया पिस्या सारखे,
झोपेतन उठुन बसले होते....
तुझा चेहरा आठवताच,
डोळयांनाही झरे फुटले होते।।५।।
आज तुझ्याशी भांडायची,
इच्छा माझी मुळीच नव्हती....
पण तुझ्या माझ्या प्रेमाला,
हि कसोटी हवी होती।।६।।
आज तुझ्यावर अज़ुनच,
प्रेम आले होते......
रागारागात तु किती प्रेम करतो,
हे...सांगुन दिले होते।।७।।
पण एक सांगु काय तुला......
आज देवा जवळ एक प्रार्थना केली होती,
आयुष्य ज़र असेल ना,
तर तुझ्या सोबत असु दे....
आणि मरण ज़र असेल,
तर तुझ्या अगोदर येवु दे...।।८।।