Vasudha Naik

Inspirational

1.2  

Vasudha Naik

Inspirational

आत्मविश्वास

आत्मविश्वास

1 min
176


डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पाठ इ.चौथीला होता. त्यातील हे एक वाक्य. "आत्मविश्वास ही दैवी देणगी आहे."

ज्या, ज्या वेळी "आत्मविश्वास" हा शब्द वाचते. त्या त्या वेळी मला तो पाठ आवर्जुन आठवतोच.

आत्मविश्वास म्हणजे काय?

स्वतःवरचा ठाम विश्वास होय. फाजील विश्वास नाही तर ठाम विश्वास.

कोणतीही कृती करताना आपला आपल्यावर ठाम विश्वास हवाय. मी हे करू शकते. असेच मनाने म्हटले पाहिजे.

बरेच जण म्हणतात 'त्यात काय एवढं, हे मी लगेचच करेन...' हा फाजील आत्मविश्वास कामाचा नाही.

आपल्यात असणाऱ्या चांगल्या, वाईट गुणांची पारख ही आपल्याला असतेच. तसाच प्रत्येकाकडे आत्मविश्वासही असतो. पण काहींना तो समजतो, तर काहींचा आत्मविश्वास समोरील माणसाने शोधून द्यावा लागतो.

आपल्याच वर्गातील एखादे उदा. पाहू. एक चुणचुणीत मुलगा कोणतीही गोष्ट करायला घाबरत नाही. बाईंच्या पुढे पुढे करतो. धाडस दाखवतो. तर एखादे मूल जागेवरूनही पटकन उठत नाही. अशा वेळी आपण शांत असणार्‍या मुलाला बोलते करतो. छोटी जबाबदारी त्याच्यावर सोपवतो, यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढीस लागतो.

कोणतेही कौशल्य आत्मसात करायला आत्मविश्वासाची जोड ही लागतेच तरच आपण आपले ध्येय गाठू शकतो.

सराव, कृती याला आत्मविश्वासाची जोड दिली तर तुम्ही उत्तम नागरीक घडू शकता आणि समाजात ताठ मानेने जगू शकता.

आत्मविश्वास अगदी मोठ्याच कृतीतून दिसायला हवा असे नाही. तर तुमच्या बोलण्यातून, आचरणातून, तुमच्या वागण्याच्या शैलीतूनही तो दिसून येतो.

आत्मविश्वास ही यश संपादनाची पहिली पायरी आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational