आत्मसन्मान - भाग- तिसरा
आत्मसन्मान - भाग- तिसरा
दुसऱ्या भागात आपण वाचलं जुई आणि जयेश आता आई बाबा बनणार....बघू या आता पुढील भागात नवीन जबाबदारीच ओझं कसं पेलतात ते दोघे....
तुम्ही आता आई बाबा बनणार आहात....काळजी घ्या.. जुईला दिवस गेले.तिच्या आईबाबांना पण कळवण्यात आलं..., आजी आजोबा बनणार म्हणून खूप खुश झालेत सगळे. ज्या दिवशी हे सर्व कळलं नेमकी त्याच दिवशी जयेशचं अप्रूव्हल आलं...आणि तो आता कॉलेज मध्ये परमनंट झाला. येणारं बाळ खूप भाग्यशाली ठरलं त्यांच्यासाठी.
आता थोडे सुखाचे दिवस आले, पगार ही भरपुर झाला. घरकामासाठी आता बाई ठेवली. थोडंस कर्ज काढून एक घर घेतलं. जयेश ने तर बाळासाठी कपडे, खेळणी घेण्याचा जणू सपाटाच लावला होता.
पण नियतीला जुई आणि जयेश च हे सुख मान्यच नव्हतं. आज जुईचा सातव्या महिन्याचा कार्यक्रम...घरी पाहुण्यांची खूप वर्दळ..जुईच्या घरचे पण सर्व आलेले. जुई छान हिरवा शालू , दागिने, मेहंदी लावून छान सजली होती.खूप तेज आलं होतं तिच्या चेहऱ्यावर. ईकडे जयेशची पण जय्यत तयारी सुरू होती....त्याने मस्त पाळणा सजवला होता. एवढयात जुईने त्याला आवाज दिला. जुई- जयेश, अरे बघ ना! अजून फोटोवाला आला नाही. कॉल पण उचलत नाहीये तो... जयेश-अग...तू नकोस काळजी करू...मीच घेऊन येतो त्याला.... "यु गया और यु आया"... असं म्हणत हसतच तो निघाला... जयेश ने बाईक काढली, आणि निघाला. आणि अचानकपणे मागून येणाऱ्या पाण्याच्या टँकरने त्याला मागून ठोकर मारली. त्याचा मोबाईल एका बाजूला पडला आणि फुटला. त्याला डोक्याला खूप लागलं, खूप रक्तस्त्राव झाला... इकडे बराच वेळ झाला जयेश अजून आला नाही म्हणून जुई खूप कॉल करतेय, पण... धिस नंबर इज नॉट रिचेबल... असाच आवाज... जुई खूप घाबरली. घरचे सगळेच काळजीत पडले. एवढ्यात जुईच्या मोबाइलवर एक कॉल आला....
हॅलो... मिसेस जयेश बोलताय... जुई- हो ...मीच मिसेस जयेश... जयेशची पत्नी.... बोलतेय.. बोला
.... काय???? काय बोलताय आपण..... म्हणत खाली कोसळली...
तिच्या आईने तिला पाणी पाजलं.... जुई, काय झालं....सांग ना बेटा...
कसंबसं स्वतःला सावरत तिने तिच्या सासू सासऱ्यांना आईबाबांना सर्व सांगितल.... पूर्ण वातावरण शोकमय झालं. सर्वजण हॉस्पिटलला गेले. पण तोपर्यंत सर्व संपलं होतं. डॉक्टरांनी ब्रेन डेड म्हणून सांगितलं. त्याही परिस्थितीत जुईने जयेशच्या अवयवदानाचा निर्णय घेतला. जयेश आता जिवंत नव्हता, पण त्याचे डोळे, किडनी हे गरजु व्यक्तीना देऊन त्याने अनेकांना जीवनदान दिले.
जुईचे आई वडील जुईला बाळंतपनासाठी आपल्या घरी घेऊन गेले. आपल्या जयेश च्या बाळासाठी आपल्याला जगायचंय म्हणून ती स्वतःची, पोटात वाढणाऱ्या बाळाची खूप काळजी घेत होती... जे घडलं होतं ये खूप वंचित होत....पण आता ती एकटी नव्हती, जयेश च बाळ, त्यांच्या प्रेमाचं प्रतीक तिच्या गर्भात वाढत होत...त्याच्यासाठी जगणं आवश्यकच होत. आज जुईने एका सुंदर, गोंडस बाळाला जन्म दिला. पूर्ण जयेशवर गेला होता बाळ. काळे काळे घनदाट केस, मोठाले बोलके डोळे... जणू दुसरा जयेशच. त्याचं नाव ठेवलं "यश" आता यश दोन महिन्याचा झाला. जुई परत आपल्या सासरी जायला निघाली. तिचे आई बाबा तिला परत पाठवायला तयार नव्हते. पण जुई खूप स्वावलंबी.
तिच्या हट्टापुढे कुणाचं चालणार... आता ती आपल्या जयेशच्या घरी आली. यशच्या बाललीला, कौतुक यात दिवस सरत होते. आता तो एक वर्षाचा झाला, तिने आपल्या सासू सासऱ्यांना परत नोकरी करण्यासाठी परवानगी मागितली. आता यशला त्याचे आजी आजोबा सांभाळायचे. आधीच्या नोकरीचा अनुभव पाठीशी होताच, तोच कामात आला.
आज ती पण परमनंट झालीय... जयेशचा लहान भाऊपण इंजिनीयर झाला, त्याचंपण लग्न झालं. जयेश गेला, पण फ़ार मोठी जबाबदारी जुईवर सोपवून... आणि ती जबाबदारी जुईने मोठ्या आत्मसन्मानाने पार पाडली... यशवर कौतुकाचा चहूकडे वर्षाव होतोय... हा कौतुकोत्सव जयेश भिंतीवरून मोठ्या कौतुकाने हसत बघतोय ही जुईची आभासी कल्पना... देशील ना रे तू साथ माझा पाठीराखा बनून...