Jyoti gosavi

Inspirational Others

3  

Jyoti gosavi

Inspirational Others

आळशी रंगा

आळशी रंगा

2 mins
276


मूळ कथा

चार रुपये (मालगुडी डेज) 


रंगा नावाचा एक मजूर असतो. तो झाडावरील नारळ उतरवण्याचे काम करत असतो. परंतु तो खूप आळशी असतो. घरातील सगळे पैसे संपल्याशिवाय आणि बायकोने आणि सासूने हाकलल्याशिवाय तो कामधंद्यासाठी बाहेर पडत नसे.

दिवस डोक्यावर आला तरी पांघरूण घेऊन झोपत असे.


एकदा त्याच्या घरातील सगळे पैसे संपून गेले. संध्याकाळच्या जेवणासाठीदेखील काही नव्हते तेव्हा बायकोने त्याला जबरदस्ती कुठेतरी जाऊन काम कर म्हणून घरातून बाहेर काढले. 


रंगाला खरंतर काम करायचेच नसते तरीपण दोन चार नारळाच्या बागा असणाऱ्या घरी जाऊन त्याने, "नारळ उतरवून देऊ का? अंगण साफ करून देऊ का?” असे विचारले परंतु आज त्याला कोणाकडेही काम मिळाले नाही. शेवटी कंटाळून थकून तो बाजारामध्ये एका कट्ट्यावरती बसून राहिला.


*******************


लंपन हा सावकाराच्या घरी नोकर होता. त्याच्या हातून विहिरीमध्ये एक पितळेची कळशी पडली. ती कळशी मालकीणबाईंच्या माहेराहून दिलेले होती. त्यामुळे त्या कळशीचे त्यांना विशेष प्रेम होते. त्यांची परंपरागत कळशी होती. त्यामुळे मालकीणबाई त्याच्यावर रागावलेल्या होत्या. कुठे पण जा, कोणाला पण घेऊन ये, पण माझी कळशी वर काढून दे. नाहीतर मी तुला नोकरीवरून काढून टाकेल, अशी लंपनला धमकी दिली होती. त्यामुळे लंपन बाजारामध्ये प्रत्येकाला विचारत होता कोणी विहिरीमध्ये उतरणारा माणूस आहे का? माझ्या मालकीणबाईंची कळशी विहिरीतून काढायची आहे. 

शेवटी दिवसभर काहीच काम न मिळाल्यामुळे रंगा विहिरीतील कळशी काढण्यासाठी तयार होतो. त्यासाठी तो अख्खे दोन रुपये मागतो.


लंपन लगेच तयार होतो कारण त्याच्या नोकरीचा प्रश्न असतो. परंतु प्रत्यक्षात रंगा कधीच विहरीत उतरलेला नसतो. त्याला पाण्याची भीती वाटत असते. कामाच्या लोभापायी तो विहिरीपर्यंत जातो परंतु एवढी खोल विहीर पाहिल्यानंतर त्याला भीती वाटत असते. पण! पण आता माघार घेता येत नसते. मालक-मालकिणबाई त्याला पैसे वाढवून देतात. शिवाय जेवायला देखील घालतात. चांगला सदरा आणि लूंगी देण्याचे आमिष दाखवतात.


त्यानंतर तो तिथेच ताणुन एक झोप काढतो आणि मालकांचा डोळा चुकवून पळून जाण्याचा प्रयत्न करतो. परंतु लंपन त्याला पुन्हा धरून आणतो आणि एका दोराला बांधून त्याला जबरदस्ती विहिरीत उतरवतात.

 

विहिरीतील पाण्यात सोडल्यानंतर त्याच्या पायाला एक घडा लागतो परंतु तो खूप जड असतो. त्यामुळे कसातरी कसरत करत तो हाताने घडा उचलतो. तर त्याच्या हाताला अजून एक धडा लागतो. तो मालकाचा घडा असतो. तो घडा पायामध्ये धरतो. आणि हातामधील घड्यात पाहतो तर त्या घड्यांमध्ये सोन्याच्या मोहरा भरलेल्या असतात.


रंगा दोन्ही घडे घेऊन वर येतो.

मालक त्याला एका घड्याचे चार रुपये देतो, परंतु दुसऱ्या घड्याबद्दल काही देत नाही. उलट तो घडा त्याला बक्षीस देतो.


रंगा! तो घडा तुझ्या नशिबात होता हे खरे. ते आमच्या पूर्वजांचे धन आहे. त्या विहिरीत गुप्तधन आहे आम्हाला माहीत होते, परंतु आम्हाला कुणाला कधी मिळाले नाही. मी जर तुझ्याकडून जबरदस्ती काढून घेतले तर त्यांची माती होईल. तेव्हा मोहराने भरलेला घडा तू असाच बक्षीस म्हणून घरी घेऊन जा. रंगाला खूप आनंद होतो आणि देवाचे आभार मानत तो घरी मोहराने भरलेला घडा घेऊन जातो. 


तात्पर्य : कोणत्याही गोष्टीला प्रयत्न केल्याशिवाय यश मिळत नाही.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational