STORYMIRROR

🤩ऋचा lyrics

Classics Inspirational

4  

🤩ऋचा lyrics

Classics Inspirational

आली ग लक्ष्मी आली

आली ग लक्ष्मी आली

1 min
458

ए चला पटकन आवरा, झाली की नाही तुमची तयारी, अग रांगोळीच्या बाजूने फुलांची आरास करा पोरींनो, आणि ते झालं की फुलांच्या पायघड्या घाला गं गेटपासून... चला चला, मला अजून आरतीच्या ताटाची मांडणी करायचीय औक्षणासाठी... साडी कोणती नेसू हे ही अजून ठरवलं नाहीये. गजरा आणून ठेवलाय बघ समोरच्या तुळशीत तो तेवढा आत घेऊन या गं कोणीतरी आणि अगं मापटं भरून ठेवलंय बरं का... आवरा आवरा चला चला... येतील केव्हाही मंडळी आमच्या लक्ष्मीसोबत...


काय वाचकहो, ही लगबग पाहून लगीनघाई सुरूय असंच वाटलं असेल ना तुम्हाला? अहो पण आज जोशी घरात त्यांची नात येतीय, तिचं स्वागत करण्यासाठी ही सगळी तयारी... कोण म्हणतं स्त्री जन्माचं स्वागत होत नाही, इथे बघा, किती जय्यत तयारी सुरूय😊 


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics