आजच उद्यावर
आजच उद्यावर
घरातच सर्वजण आहेत पण कोणी कोणाशी बोलत नाही सर्वजण मोबाईल, लॅपटॉप मध्ये डोक खूपसून, समोरा समोर बोलायचे सोडून व्हाटस् अॅपवर मेसेजेस करतात, रिप्लाय आला नाही तर बघतात मेसेज रीड केला का नाही...
काय वेळ आली न, आता घरात चारीही जण आहे पण वेळच नाही एकमेकांशी बोलायला!
नेहमी वाटायच आज नाहीतर उया असे छान एकत्र येऊ आणि मस्त पुर्विसारख गप्पा गोष्टी करत जेवण सोबत करूया!
आधी कशी मज्जा येत होती तशी!
पण नाही, सगळे मोठे झाले, कमवते आहे, काय केल7 पैशांचे हे विचारायची सोय नाही, अरे उद्याचा दिवस कसा असेल हे गृहीत धरू नका पैसे साठवा म्हणजे, वाईट काळात हातात आपला पैसा, मैत्रीचे चार लोक सोबत असण किती गरजेचे आहे आता समजणार नाही, नाहीतर तहान लागली तेहा विहिर खोदणार का? अशी परीस्थिती होणार!
बघा आता तशीच वेळ आली आहे, रोज नव नविन बातम्या येत आहे, पैसा आहे पण चार मित्र, लोक सोबत नाही, चार चांगले मित्र सोबत असेल तर एकमेकांना कोणत्याही वेळी कामी पडता! वेळेला सोबत पाहिजे म्हणून मैत्री होत नाही, ती निस्वार्थीपणे जपायला हवी, उद्याचा दिवस कसाही असलातरी जगायला एक उर्मी देते!
पैश्यांसोबतच, मैत्रीचीपण बँक सोबत असू द्या म्हणजे आजच उद्यावर टाळायला यमदेव स्वतःच हो म्हणेल आणी माघारी फिरेल!
