आईची माया
आईची माया
आशिष एका नामांकित कंपनी मध्ये जॉबला होता.कामात अतिशय हुशार होता..ऑफिस मध्ये सतत त्याचे कौतुक होतं असे...सगळेच खूप खुश होते त्याच्या कामावर..पण त्याला आता थोडा break हवा होता..कुठेतरी long weekend ला जावं असा तो विचार करत होता..तेव्हा आईने सांगितले की आजी आजोबा तुझी खूप आठवण काढत आहेत..जाऊन ये थोडे दिवस..तो ही तयार झाला..
आशिषने आदल्या दिवशी तिकीट book केलं...पहाटेची गाडी होती म्हणून तो रात्री packing करून लवकर झोपला... पहाटे निघताना आईने प्रवासासाठी आणि सासू सासर्यांना देण्यासाठी काही पदार्थ बांधून दिले...आशिष निघाला... 5-6 तास प्रवास करून तो गावी पोचला..तो बऱ्याच वर्षांनंतर गावी येत होता...मधल्या काळात गावात बरीच सुधारणा झाली होती..त्याच्या आजी आजोबांचे घर स्टॅन्डपासून थोडं लांब होतं..तो auto ने घरी पोचला..तो जिथे उतरला तिथे एक मोठं झाड होतं आणि त्याच्या पारावर बरीच लहान मुलं खेळत होती...त्यांना बघून आशिषला आपले बालपण आठवले...तो घराकडे निघाला...आजी आजोबा त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसले होते..आशिषला बघून दोघेही खूप खुश झाले...त्यांने वाकून दोघांना नमस्कार केला आणि घरात गेला...खूप गप्पा गोष्टी केल्या तिघांनी...
संध्याकाळी पाय मोकळे करायला आशिष terrace वर गेला..त्यांच्या terrace वरून ते झाड दिसायचं ज्या झाडाच्या पारावर लहान मुलं खेळायची... संध्याकाळ झाल्यामुळे सर्व मुलं आपापल्या घरी निघून गेली..पण एक 9-10 वर्षांची मुलगी तिथेच बसली होती.आशिषने पाहिलं पण दुर्लक्ष केलं..
दुसऱ्या दिवशीही तेच...ती मुलगी दिवसभर तिथेच बसून असायची...एकदा आशिषने तिला रात्रीही तिथेच बसलेलं पाहिलं.. आशिषच्या मनात शंकेची पाल चुकचुकायला लागली...तो जेव्हा बघेल तेव्हा ती मुलगी पारावरच असायची...त्याला काळजी वाटू लागली होती...असं एखाद्या लहान मुलीने एकटच पारावर बसणं त्याला विचित्र वाटू लागलं होतं...न राहवून त्याने आजोबांना विचारायचं ठरवलं...त्याच्या आजोबांनी त्याला त्याला त्या मुलीची कहाणी सांगितली..
दोन वर्षांपूर्वीची गोष्ट...कुमुद, तिचे आई, आणि बाबांसोबत राहत होती..कुमुदचे बाबा तिच्या आईला रोज मारत असतं..तिच्या बाबांची जी काही मिळकत यायची ती ते दारू मध्ये उडवत असे...तिची आई धुणी भांडी करून घरखर्च चालवत असे...आशिषच्या आजीकडे पण ती येत असे...आजी कधी त्यांना थोडीफार मदत करत असतं..असेच दिवस चालले होते..एके दिवशी कुमुदच्या आईचे आणि बाबांचे खूप भांडण झाले..तिची आई घर सोडून निघून गेली...कुमुद रात्रभर रडत होती..तिचे बाबा दारू पिऊन झोपले ते सकाळीच उठले...ती पण रडून रडून झोपून गेली...पहाटे जाग आल्यावर आईला शोधण्यासाठी कुमुद बाहेर पडली...थोड्या अंतरावर गेल्यानंतर तिला कळलं की आईने झाडाच्या फांदीला गळफास लावून आत्महत्या केली.. कुमुद ओक्सबोक्शी रडू लागली....कुमुदच्या बाबांना कोणीतरी कळवले...ते देखील धावत आले...तिचा मृतदेह पाहून डोक्याला हात लावून बसले...पश्चाताप करण्यावाचून काहीच उरले नव्हते...
कुमुदच्या आईच्या जाण्याचा तिच्या बाबांवर काहीच परिणाम झाला नाही...ते अजूनच दारूच्या आहारी गेले...त्यातच त्यांचा अंत झाला...आधी आई आणि आता बाबा..दोघेही सोडून गेल्यामुळे कुमुद पार सुकून गेली...गावातल्या कोणीतरी अनाथाश्रमात कळवले...तिला तिथे नेण्यात आले..ज्या दिवशी तिला नेलं त्याच्या दुसऱ्या दिवशी कुमुद पुन्हा त्याच पारावर झोपलेली दिसली...तिला विचारले तेव्हा कळलं की रात्री तिची आई तिला इथे घेऊन आली...सगळेच घाबरले..असं कसं होऊ शकत...दोन तीन वेळा तिला अनाथाश्रमवाले घेऊन गेले पण ती तिथे थांबायची नाही...दुसऱ्या दिवशी ती पारावर असायची...गावातल्यांनी तिला एकटच बडबड करत असताना पाहिलं आहे...ती तिथेच राहते... झोपते..जणू काही तिच्या आईच्या कुशीत झोपली आहे...आणि तिच्या आईचा आत्मा तिथेच आहे मुलीला सांभाळायला...कुमुदमध्ये तिच्या आईचा जीव अडकलाय..
हे सर्व ऐकून आशिष स्तब्ध झाला...एक आई मृत्यूनंतरही मुलीची कशी काळजी घेते, याच ते एक सर्वोत्तम उदाहरण होतं...
