Click Here. Romance Combo up for Grabs to Read while it Rains!
Click Here. Romance Combo up for Grabs to Read while it Rains!

Lata Rathi

Inspirational


3  

Lata Rathi

Inspirational


आई बाबा तुझे नि माझे - भाग 2

आई बाबा तुझे नि माझे - भाग 2

3 mins 12.1K 3 mins 12.1K

सायलीने लवकर स्वयंपाक आटोपला, सासू-सासऱ्यांना जेवण, औषध दिली.... स्वतः जेवण करून उद्याच्या तयारीला लागली.... संजय मात्र काही झालंच नाही... याच तोऱ्यात वावरत होता.पण तिच्या चेहऱ्यावरून मात्र काहीतरी झालंय नक्की...असं त्याला वाटलं...असेल कदाचित ऑफिस च टेन्शन म्हणून त्याने दुर्लक्ष केलं. आणि जेवण करून तो झोपला. सायलीच्या मनात विचार आला कित्ती सोपं असतं ना पुरुषांसाठी मस्त होऊन जगणं...आपन मात्र घर , ऑफिस दोन्ही सांभाळतो तरी दुर्लक्षितच... फक्त म्हणण्यापूरतीच का ही स्त्री-पुरुष समानता.... घरातल सार आवरून ती झोपायला गेली... संजय ढारढुर झोपला होता... तिला मात्र झोपच येत नव्हती. आपल्या आईला किती त्रास झाला असेल आपल्याला वाढवण्यात, खर्च पण आला असेल....आता तिचं कुणीच करणार नाही, निदान संजय ने तरी करावं.... रोज मी वाचते स्त्री-पुरुष समानता....मग का हा अन्याय...मुली च लग्न झालं की ती तिच्या घरच्यांना काहीच मदत नाहीं करू शकत, त्यांना वेळ नाही देऊ शकत...इतकंच काय मीच काम करून कमवते ,पण तो पैसासुद्धा सासरीच द्यायचा... माझ्या आईचा त्यावर काहीच अधिकार नाही??? तिने जर मला शिकवलं नसतं,, तर??? मुलगी माहेरी दोन दिवसासाठी जरी आली तरी तिचं सासर सोबत असतंच तिच्या...रोज सासुसासऱ्यांना फोन करणं अनिवार्य...👍 पण जावई करतो का रोज फोन...नाही ना... का त्याला compulsary नाही....रोज बोलणं व्हावच म्हणून... मग ही कसली समानता हो... जग बदलत चाललंय ...पण आपण मात्र तिथल्या तिथंच.


आता मात्र तिला जोरदार हुंदका आला...आणि ती रडायला लागली.😢 तिच्या आवाजाने संजय ला जाग आली. संजय-सायली, काय झालं...का रडतेस? ऑफिसमधून आल्या पासन बघतेय... खूप टेन्शन मध्ये आहेस....काही सांगशील तर कळेल ना? सायली---अरे----आई... संजय-काय झालंय आईला... सायली--अरे आईला नुमोनिया झालाय...आज तिकडेच गेले होते मी.डॉक्टरकडे घेऊन गेले होते.मी तुला सार सांगणार होते, पण तू किती ओरडला माझ्यावर. संजय, ऐक ना...आपण काही दिवस आनुयात का रे आपल्याकडे....म्हणजे मला तिच्याकडे पण लक्ष देता येईल. अर्थात तुला काही हरकत नसेल तर.... संजय---अग, अस का म्हणतेस?खरं तर माझंच चुकलंय.... तू इतक्या छान जबाबदारीने माझ्या आईबाबांना संभाळतेस म्हणूनच तर मी निश्चित. पण मी मात्र माझी जबाबदारी विसरलो ग...बर झालं आज तू हे सांगितलं....तुम्हा स्त्रियांसारख मन नसत ग आमचं...सर्वांना लगेच आपलं करणं... उद्याच मी आईला घेऊन येईन...तू झोप आता.. सायली आश्वस्त होऊन झोपली खरी..., पण संजय ची मात्र झिप उडाली....तो विचार करू लागला....आपल्या घरच्या गरजा, होम लोण....यासारख्या अनेक आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी सायली माझ्या बरोबरीने काम करते...नाही नाही ती double shift मध्ये काम करते....घर सांभाळणं, प्रत्येकाच्या आवडीनिवडी जपणं, आलेल्या पाहुण्यांची खतीरदारी करणं तेही नोकरी सांभाळून....खरंच तारेवरची कसरत असते यांची. सलाम यांच्या सहनशीलतेला🙏 एवढं करून सुद्धा तिची फक्त छोटीशी अपेक्षा.... आपल्या आईला सांभाळणं....ती छोटीशी जबाबदारी सुद्धा आपण घेऊ नाही शकत!! पुरुषी अहकारच म्हणावा हा.. आपण स्त्री पुरुष समानता म्हणतो-याचा अर्थ फक्त आर्थिकदृष्ट्या महत्वाचा नाही, तर संवेदनशील दृष्ट्या सुद्धा महत्वाचा आहे. ज्या मुली आईबाबांना एकट्याच आहेत, त्या पालकांनी काय करावं...ही जबाबदारी जर जावंयाने मुलगा बनून उचलली तर..... वृद्ध आईवडील मुलाचे असोत अथवा मुलीचे परावलंबी तर वयीमानवरत्वे होतातच. त्यांची जबाबदारी जेवढी सुनेची तेवढीच जावयाची पण... सकाळीच संजय सासुरवाडीला गेला आणि आईला घेऊन आला.... स्त्री-पुरुष समानता हक्क बजावण्यासाठी.... सायली काहीच बोलली नाही, पण संजयमधील समजूतदारपणा जागला...


Rate this content
Log in

More marathi story from Lata Rathi

Similar marathi story from Inspirational