आधार
आधार
"अहो! तुम्ही स्वाभिमान विकून खाल्ला की काय?
मालकांच्या सुनबाई तुम्हाला सतत घालूनपाडून बोलत असतात आणि तुम्ही नुसतं ऐकून घेता."
तेव्हा तो म्हणाला "अगं! मोठ्या मालकांकडे पाहून चूप बसतो. माय-बापाच्या नंतर त्यांनीच तर मला आधार दिला. आज त्या थकल्या जिवाला माझ्या आधाराची गरज असताना त्यांना मी कसा सोडून जाऊ?" असे म्हणत हलकेच उपरण्याने डोळे पुसले.
