8 मार्च महिला दिन
8 मार्च महिला दिन
सुजाता आज ऑफिसमधून घरी येत होती, आज खूप खूश होती. महिला दिन असल्याने आज ऑफिस मध्ये खूप छान सेलिब्रेशन केलं होतं साऱ्यांनीच. चालतचालत ती रिक्षा मिळतेय का पाहत होती तिथेच तिला एक भयानक कृत्य दिसलं. एक नवरा त्याच्या बायकोला जोरजोरात शिव्या देत होता, तिला मारत होता, आणि ती बिचारी बायको रडत होती. सुजाताला हे दृश्य पाहून खूप वाईट वाटलं. ती ताबडतोब तिथे गेली आणि तिच्या नवऱ्याला म्हणाली का तुम्ही मारताय हिला? त्यावर नवरा म्हणाला, ती माझी बायको आहे, मी तिच्याशी कसाही वागेन, तुम्ही कोण? आणि असं न विचारता आमच्या घरात कसं घुसला? त्यावर सुजाता म्हणाली, मी कोण हे फार महत्वाच नाहीये. सुजाताने त्याच्या बायकोचे डोळे पुसले, व तिला ह्या घडल्या प्रकाराचं कारण विचारलं, त्यावर त्या स्त्रीने सांगितलं की दररोजच असा प्रकार घडतो, नवरा म्हणून गप्प बसावं लागतं. बाईची जात आपली, काय करणार आपण? त्यावर सुजाता म्हणाली, कोणत्या जगात वावरतेस तू? अग आता स्त्री-पुरुष समानता आहे. विनाकारण तुझा नवरा तुला मारतोय आणि तरीही तुला हा अन्याय वाटत नाहीये का? अग आज तर महिला दिन आहे. तुला तुझे हक्क अधिकार आहेत, तुला तुझं अस्तित्व आहे. आणि तुझ्यावर अन्याय होत असेल तर तू अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पुढं यायला पाहिजेस. तू तुझ्या नवऱ्यावर घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल करू शकतेस, त्यावर तो नवरा घाबरतो व म्हणतो, माफ करा ताई, मी आता असा अजिबात वागणार नाही. माझी चूक झाली. सुजाता म्हणते समाजात स्त्री पुरुष हे दोन्ही समान आहेत, तू नवरा आहेस म्हणून बायकोवर अत्याचार करणार हे कोण सांगितलं! खबरदार जर पुन्हा असं काही करशील तर! त्यावर ती बाई म्हणते, खूप धन्यवाद ताई, तुमच्यामुळे हे सगळं शक्य झालं. सुजाता आता त्यांच्या घराच्या बाहेर येते, आणि आज तिला एक महिला दुसऱ्या महिलेला तिच्या हक्कांविषयी जागृत करते तेही महिला दिनादिवशीच याचं तिला सार्थक वाटलं...
आपल्या समजाला सुजातासारख्या स्त्रियांची जास्त गरज आहे... ज्या दिवशी प्रत्येक स्त्री सुजातासारखी जागरूक बनेल त्याच दिवशी खरा महिला दिन साजरा होईल, नाही का!😊
