२०२९ हे वर्ष
२०२९ हे वर्ष


आता उद्या २०१९ हे वर्ष संपणार. एकतीस डिसेंबर झाला की नवीन वर्षाची सुरुवात होते आणि हां हां म्हणता वर्ष कधी संपून जातं कळतच नाही. हे प्रत्येक वर्षी असंच असतं पण २०१९ साल हे जरा वेगळच गेलं.
ह्या वर्षाच्या दुसऱ्या महिन्यात म्हणजे १४ फेब्रुवारीला पुलवामा हल्ला झाला. जम्मू आणि काशमीरच्या पुलवामा जिल्ह्यात, जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर, लेथापोरा या अवंतीपोरा जवळ राखीव पोलिस फोर्सच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या सुरक्षा दलांच्या वाहानाच्या एका ताफ्यावर दुपारी सव्वातीन वाजता एका आत्मघातकी हल्लेखोराने आपल्या वाहनासकट हल्ला केला. त्या हल्यात चाळीस जवान घटनास्थळी मृत्यूमुखी पडले. तो हल्लेखोर ही मेला पण ही अत्यंत निंदनिय आणि धक्कादायक गोष्ट घडल्याने प्रत्येक भारतीयांच्या मनात तिरस्कार आणि घृणा निर्माण झाली.
ह्या वर्षाचा सर्वात मोठा दुसरा धक्का म्हणजे महाराष्ट्रात झालेली अति वृष्टी आणि त्याच्या तडाख्याने सांगली सातारा आणि कोल्हापूर ह्या तीन शहरांची झालेली वाताहत. अक्षरशः बघवेना असे झाले. नेहमीच येई पावसाळा पण ह्यावेळेचे त्याचे रौद्र रुप पाहिले. नदी दुथडी भरून वाहू लागली व सारे पाणी गावात आणि शहरात घुसून तेथील लोकांची घरे गायी म्हशी आणि माणसे ही पाण्यात बुडाली. सैनिकांनी आणि नौदलाच्या लोकांनी मदत केली पण अफाट नूकसान झाले ते काही भरून येणे शक्य नव्हते. तेथल्या लोकांना त्रास झालाच पण बघणाऱ्यांचे ही काळीज तीळ तीळ तुटले. निर्सगाचा कोपच झाला होता.
तसे ह्या वर्षात चांगल्या ही बऱ्याच घडामोडी झाल्यात. पण वरच्या दोन गोष्टी माझ्या जिव्हारी लागल्या. आता ही आठवल्या तरी मन व्याकुळ होते.