Vasudha Naik

Inspirational

1  

Vasudha Naik

Inspirational

2019 मला कसे गेले

2019 मला कसे गेले

3 mins
288


निरोप तुजला देता...

नि..निर्मिती नवीन

रो...रोप लावले कवितांचे

प...पतंग उडाला काव्यसंग्रहाचा.....


   जानेवारी २०१९ हा महिना माझ्या जीवनातील कलाटणी देणारा महिना ठरला.

   या महिन्यात सातवा वेतन आयोग प्रत्यक्ष लागू झाला व दोनच महिन्यात हातात मिळायला लागला.

  जी ओढाताण घर भागवताना व्हायची ती खूपशी कमी झाली.खूपप हायसे वाटले. 

   फेब्रुवारी मधे मोतीबिंदूचे आॅपरेशन झाले.एकाच डोळ्याचे केले.कारण अमेरिकेला जाण्यासाठी व्हिसा काढायचा होता.त्यात पुढील काही दिवस बिझी जाणार होते.

  मुलाचे इंजिनिअरचे शेवटचे वर्ष चालू होते.त्याला अमेरिकेला जायचयं एम.एस. करायला त्यामुळे जी.आर.ची.परीक्षा देण्यासाठी आम्ही मुंबईला रवाना झालो.दि.१८ मार्चला आणि व्हिसाची दि.१९ मार्च होती.

  १८ मार्चला मुलाला परीक्षा केंद्रावर सोडले.मी व भावजय दोघींनी मिळून अमेरिकेला जाण्यासाठी शाॅपिंग केली.व्हिसा मिळेल की नाही माहित नव्हते.पण खरेदी तर केली.

   १९ मार्चला सकाळीच व्हिसाच्या ओळीत आम्ही दोघे उभे राहिलो.नं. आला इंटव्ह्यू झाला आणि अतिआनंद झाला दोघांनाही व्हिसा मिळाला...

  हुश्श झाले.भावजयीने आईसारखे आम्हांला मिठी मारली .

   आता पुढील तयारीला लागलो.२७ एप्रिलची तिकिटे माझ्या दीराने काढली.जे अमेरिकेत गेली २३ वर्ष स्थाईक आहेत.आम्ही आनंदलो.

   शाळेत सांगितले होतेच पण मुख्याध्यापक ऐनवेळी नाही म्हणून पडल्या हातभर मेमो दिला.शाळेच्या वेळात जायचे नाही म्हणाल्या. मी खूप रडले.

   माझा आनंद त्यांनी हिरावून घेतला.उत्साह थोडा विरला.मी दिरांना मेमोची काॅपी पाठवली.ते म्हणाले"वसू तू हे परत दे त्यांना,तूआजपर्यंत मानाने नोकरी केलीस आताही या पुढेही करायचीय.मी तिकिट पुढच्या दिवसांचे काढतो."

  दिराने २ मेचे तिकिट काढले.मी मेमो शाळेला परत दिला.आणि आता मी नंतरच जाईन असे सांगितले.बाई जरा आवाक झाल्या.म्हणाल्या"मी कुठे बाई नाही म्हटल..जा की तुम्ही" जरा आमच्यात संवाद झाले.बाई जरा कचरल्या.त्यांना असे काही होईल हे वाटलेच नाही.

    झाले हे नियोजीत वेळेत भावाबरोबर USA ला रवाना झाले .त्यांना सोडून आले.स्वप्नपूर्ती झाली आम्हा दोघांची.

   रिझल्ट झाला.१ मे झाला.२ मेची शाळा करून सर्वांचा निरोप घेवून मी USA ला निघाले.मुले सोडवायला आली.मी कधीही विमानतळ सुद्धा न पाहिलेली बाई ती आज एकटीच अमेरिका प्रवास करत होती.उत्साह,धीराने मी अमेरिका गाढली. तिथे माझे स्वागत खूप हर्षभराने झाले.सर्वांना खूप कौतुक वाटले माझे.हा अविस्मरणीय अनुभव जीवनात कधीच विस्मरण होवू शकत नाही.येताना मला समजले 'बेटी फाँडेशनचा '"रणरागिणी"पुरस्कार मिळाला.मी अतीआनंदाने मनात मोरासमान नृत्य करू लागले.

  जून ३ ला "काव्यस्पंदन "तर्फे प्रातिनिधिक काव्यसंग्रहात कविता लेखन होते.तो प्रकाशन सोहळा झाला...त्याचे फोटो अमेरिकेतच पाहिले.अंतरातमी सुखावले.

   जून मधे मुलगा इंजिनिअर झाला.त्याला ९/१० गुण पडले .मी माझे कुटुंब खूपपप खूश झाले.आणि ३ जुलै पासून "Hudal" कंपनीत त्याला नोकरी मिळाली. हा ही क्षण अती आनंदाचा.

   दररोज मी माझा छंद जपतच होते.कविता, चारोळी, लेख लिहितच होते.

   नोव्हेंबर मधे विजय दादांची भेट झाली.आमच्या इथे दादा आले होते.त्यांनी मला सुखद क्षण दिले. प्रातिनिधिक काव्यसंग्रहाची भेट दिली.पुरस्कार दिला.या गुरूंना माझे मनापासून वंदन..

   "स्टोरीमिरर" या सामाजिक अॅप वरदेखील मी लेखन करतेय माणसांना देखील माझे लेखन आवडतेय हे दिसत होते.

   नोव्हेंबर मधे नाॅन स्टाॅप नोव्हेंबर मधे लेखन करून सर्टिफिकेटस मिळवले.

   होप स्टार या चॅनेल वर रमाकांतजी यांनी या वर्षी माझ्या आठ कवितांचे गायन केले.

   आता माझ्या जीवनातील अती महत्वाचे क्षण ....जे माझे स्वप्न होते.ते पूर्ण झाले.माझा कविता संग्रह "गुंजन मनीचे" हा प्रकाशित झाला. २६ डिसेंबर या दिवशी संत्रानगरीत....

   २७ ला घरी आले तर माझ्या सासर माहेरचे सर्व जण माझ्या स्वागताला आले होते.जीवनातील हा ठेवा पहिला वहिला अविस्मरणीय योग होता.

  या सर्वांचा कौतुकांचा वर्षाव शाळेत देखील झाला.याचा देखील खूप हर्ष मनी दाटला.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational