STORYMIRROR

ritesh

Abstract Tragedy

3  

ritesh

Abstract Tragedy

युध्दाच घर

युध्दाच घर

1 min
186

होतो...इथेच होतो ज्या रात्री युद्ध चालु होत घराचं घराशी

पत्राच्या फटीतून आगीचा धूर खात्री देत होता घरातल्या युद्धाच 

याही वेळेस झोपले होते दोन शेजारी आवाज ऐकूनही 

याही वेळेस तेल ओतत होते दोन शेजारी

सर्व माहित असुनही

युद्धाची बातमी पसरवली गेली नगरात, गावात, शहरात, जिल्ह्यात 

दुपाराच्या उन्हात पोटात काही नसताना घर ओकत होते आगीचं थारोळं

आगीला माज चढला होता युद्ध पेटवल्याच

घरातल्या फ्रिज चा बर्फ वितळू लागला 

आणि आगीने माघार पत्करली थंड योध्यासमोर 

आता ते घर नव्हतं येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी थांबून पहायचं शिल्प होतं 

असं शिल्प जे सांगत राहील अस्तित्व 

एकेकाळी असण्याच....युद्ध होण्याच....



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract