यशाची स्वप्नं पूर्ण कर
यशाची स्वप्नं पूर्ण कर


इथून वाटतही असेल उंच परी ते उंच नाही....
कितीही वाटत असेल अशक्य तरी ते अशक्य नाही....
दाखवून दे तुझा कणखरपणा त्या उंच शिखराला....
सांगून टाक त्याला आहे माझ्यात ताकत भिडण्याची आकाशाला....
कमजोर तू नाहीस तुझे विचार असतील....
बदलून टाक त्या विचारांना नाहीतर सर्व तुजला हसतील...
स्वकर्तृत्वावर विश्वास ठेऊन अडचणींना लढा दे...
जिंकण्याची पर्वा कर हरण्याचे विचार सोडून दे...
आत्मसन्मान जागा कर....
जिंकण्याची इच्छा धर....
संघर्षाची लढाई लढणे पसंत कर....
गगनभरारी घेऊन यशाची स्वप्न पूर्ण कर....
यशाची स्वप्न पूर्ण कर...