येऊ दे क्षण परतुनी...!
येऊ दे क्षण परतुनी...!
काढावी रांगोळी प्रत्येकानी दारी
कणभर त्या कनांनी
रंगापरी सुंदरता
पेरा विचार सु मनांनी.....
रोषणाई दिसे लक्षवेधी
इवल्याश्या दिव्यापरी
प्रकाशमान व्हा आता
ज्योतीच्या वातीपरी.....
फोडा आनंदात फटाके बाजी
नका करू प्रदूषणाची हानी
निसर्ग हि थकला आता
कसा देईल तुम्हा - आम्हास पाणी.....
खरी दिवाळी नाही आता
तव अंगणात शेणाचा असे सडा
सजवली जात होती घरं
लाल मातीच्या रंगांचा धडा.....
नसे घरात खायला काही
तरी केला जायचा फराळ भारी
त्या आठवणी दूर सरल्या आता
जो तो असतो मर्जीत आपल्या दारी
कुणालाच कुणाचं पडलं नाही आता
विसरला माणूस आपल्याच माणसाला
पुन्हा शोध घे परतीचा
ये परतूनी आपल्या दिवाळी सणाला.....