व्यथा
व्यथा
अरे देवा ,
काय सांगू माझी व्यथा !!
धावपळीच्या जीवनात
जगणं झालं नकोसं
पैशाच्या मागे,
धावता धावता
हसणं मात्र विसरलो.
काय सांगू माझी व्यथा...
पैशाला महत्त्व देता देता,
माणूसकी विसरलो.
उच्च नीच करता करता,
खरी श्रीमंती विसरलो.
काय सांगू माझी व्यथा....
यशाच्या मागे पळता पळता,
घरापासून दुरावलो.
ध्येयाला महत्व देता देता,
नाती मात्र विसरलो.
काय सांगू माझी व्यथा...
काहीतरी उपाय दे ना मला
एकट्याने आयुष्य काढता
काढता जीवन गेलं सारं.
काय सांगू माझी व्यथा....
