माझा होशील ना...
माझा होशील ना...
माहेर सोडून तुझ्या अंगणी आले
साथ तू देशील ना,
नवऱ्याच्या नात्याबरोबर
मैत्रीचं नातं निभावशील ना,
सांग ना तू, माझा होशील ना...
जीवनातल्या प्रत्येक टप्प्यावर
सोबत राहशील ना,
माझ्या मनातील भावना
नजरेत तू वाचशील ना
सांग ना तू माझा होशील ना...
तुझ्या दिवसातील थोडा
वेळ, मला देशील ना
काही चुकलं तर थोडं
सांभाळून घेशील ना,
सांग ना तू माझा होशील ना !!

