वसंत ऋतूत बहरणारे प्रेम
वसंत ऋतूत बहरणारे प्रेम
आज वसंत ऋतू हा बहरला
कोकिळा गात छेडी स्वराला...
असा बेभान सुटलाय हा वारा
फुलांच्या ताटव्यात बाग फुलला
साद घाली.. सदा..असा मला
सांग कशी आवरू कशी सावरु
मनात काहूर नी वनवा पेटलेला
वसंत ऋतूत प्रेमाचा गुलाब फुलला
नकळत छेडी हा हृदयाच्या तारा
रंग चढला पाना ,फुलांफुलांना...
वसंत ऋतूस बहर हा आला..
साद असा हा घालतो मजला
छळतोय माझ्या तना मनाला
अल्लड वारा घालतो फुंकर...
हळवे मन बावरे झाले क्षणभर
असा वसंत ऋतू हा बहरला..
वसंत ऋतूची अशी पडली भर
मना लागली मग एकच हूरहूर
अंगावर शहारा असा येई सरसर
ओढ मना लागे भेटीची वरचेवर
भौरे गुणगुण करत भोवती फिरी
चुंबन घेत असा बसे हा कळीवरी
धुंदीत झुले मस्तीत अशी प्रीत फुले
वसंतातडुले मधुरस पिता फुल खिले

