STORYMIRROR

Swati Bahulekar

Children

3  

Swati Bahulekar

Children

विद्यार्थी

विद्यार्थी

2 mins
220

झाला वाढदिवस दुसऱ्या वर्षाचां 

आणि घरात रंगल्या शाळेच्या चर्चा

मी म्हणालो आई-बाबांना काय आहे घाई?

 तर आई पटकन म्हणाली असं कसं बाई?

झाला आमच्या प्रवेश नर्सरीत 

आलो रडतरडत पण गेलो मात्र हसत

गाणी गप्पागोष्टी मजा होती फार

टिफिन खाताना मात्र आई आठवायची फार

वाढलो एक वित नाहीतर दोन वीत

नेऊन बसवले की हो पहिली त 

इंग्लिश ईव्हीएस गणित जोडीला हिंदी

डोक्यात सगळी झाली विषयांची भाऊ गर्दी

बाई म्हणाल्या उद्या आहे बरं परीक्षा

मी जोरात विचारले काय आहे तुमची अपेक्षा?

बाई म्हणाल्या छान लिहायच्या पेपर

पण मला मात्र वाटे मौज वापरायला खोड रबर

हळूहळू वीत वीत वाढत गेलो

आणि वरच्या वर्गात चढत गेलो

तास सुरू झाला इतिहासाचां

बाई म्हणाल्या हा तर विषय फारच महत्त्वाचां

कराल जर अभ्यास याचा

तरच कळतील खाचां खोचा

भूगोलचे सर शिकवून गेले पृथ्वी आहे गोल गोल

फिजिक्सच्या बाई मात्र म्हणाल्या पृथ्वी आहे चपट गोल

काय बाबा कन्फ्युजन च कन्फ्युजन 

तेवढ्यात केमिस्ट्रीच्या बाईंनी चालू केले डिफ्युजन

इंग्लिश मराठी हिंदीच्या काय सांगू थरार

सारांश वृत्तलेखन पत्रलेखन आणि हे कल्पनाविस्तार

मनात विचार आला दोस्तांनो माझ्याकडे तर आहे फोन तर का करू मी हे पत्र लेखन

अरे बापरे विसरलोच की हा अल्जेब्रा

मला तर वाटतो हा किंग कोब्रा

करता वजा वजाअधिक आणि अधिक वजा वजा वाटलं आयुष्यातली सगळी संपली मजा

अजून एक राहिलाच हा जॉमेट्री

वर्गात आल्या आल्या बाईंची सुरू झाली कॉमेंट्री

ऐकता ऐकता पायथागोरसच्या सिद्धांत

मी मात्र मस्त झोपून गेलो निर्धास्त

जागा झालो खडबडून हळूच डोळे उघडले

आणि नेमके बाईंनी माझ्याकडेच बघितले

जवळ आल्या माझ्या ;वाटलं बसणार पाठीत धपाटा

पण प्रेमाने बोलल्या बर नाहीये का तुला बेटा

जोरजोरात रडू लागलो

म्हणालो मी नाही हे करू शकलो

बाई म्हणाल्या वेड्या ही तर आहे

फक्त विषयांची ओळख

तुला करायची आहे तुझीच पारख 

ठरव तुझी आवड निवड

आणि निर्धास्त चालत रहा हा गड

आहे मी तुझ्या पाठीशी

करू नको चिंता कशाशी

परिश्रम व प्रयत्नांची कर दोस्ती

मग जाईल तुझ्या मनातील ही भीती


Rate this content
Log in

More marathi poem from Swati Bahulekar

Similar marathi poem from Children