STORYMIRROR

Swati Bahulekar

Others

3  

Swati Bahulekar

Others

काळ

काळ

1 min
200

तो माझ्याकडे बघून हळूच हर्षला

म्हणाला मागे वळून बघ स्वतःला

स्वतः खूप हसून हासवत होतीस जगाला

का बदलून टाकलेस स्वतः च स्वतःला?

धावून धावून किती धावशील?

दमलीस मात्र की थांबून जाशील

मी मात्र गेलो की परत नाही येणार

मग मात्र दुःखी नको होऊस यार

व्यवहारी जगात बांधून घेतलेस तुला

आणि तूच विसरलीस स्वतःला

थांब थोडा आता मनाचे तरी ऐक

स्वतःसाठी वेळ देण्याचा प्रयत्न कर एक

नको करूस एक दिवस काम

छान पैकी झोपून मस्त कर आराम

शोध घे तू स्वतः चा 

मस्तपैकी फडशा पाड पुस्तकांचां 

म्हणता म्हणता गाठलीस पन्नाशी

आता तरी दोस्ती कर मस्त निसर्गाशी

तयार कर पटकन तुझी बकेट लिस्ट

सुरुवात कर नव्याने आता बेस्ट 

मी म्हणाले दोस्ता कळतंय पण वळत नाही

कुठे थांबायचं तेच कळत नाही

बरं झालं आठवण केली

मीच मला नव्याने ओळखू लागली


Rate this content
Log in

More marathi poem from Swati Bahulekar