STORYMIRROR

Ravindra Khanande

Abstract Fantasy

3  

Ravindra Khanande

Abstract Fantasy

वेताळघाट

वेताळघाट

1 min
196

नाती ही जुळली तेथे

तो धागा एकच होता

तो गुंता सोडवतांना

कळसावर कागा होता


ती रेखीव दिव्य कमान

समअंगी सम प्रमाण

काळोखी गर्भामधला

पुजारी जागा होता 


नदी पल्याडली आमराई

कोकिळा गाणे गाई

तो समध ढोलीमधला

मजला हाकत होता


समाधी गोसाव्याची

फतकल मारून बसली

ती पिंड महादेवाची

बाजूलाच रुसून बसली


त्या पिंपळ वृक्षावरचा

वेताळ विचकट हसतो

दाढीत घेऊनी पक्षी

तो वेडा झाला होता


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract