भैरवी
भैरवी
1 min
177
गाभाऱ्यातल्या दिव्याला काय सांगू
चंद्राळलेल्या त्या स्वरांना काय सांगू
ऐकू दे ना तुझे ते मधाळ गाणे
सूर ते भैरवीचे अन् गा तराणे
मारव्याचा त्या स्वरांना काय सांगू
झापटीला बदलले आकाश सारे
मालवले गोजिरे सारेच तारे
चांदनीस त्या आभाळी काय सांगू
घेतली तान छेदले ब्रह्मांड सारे
वाटते तरी तुला थोतांड सारे
माझ्या मनाला मी अता काय सांगू
जाऊ दे तो सूर्य आता गार झाला
भावनांचा होऊ दे गोपाल काला
बिलगलेल्या राधेला काय सांगू
