STORYMIRROR

Ravindra Khanande

Others

3  

Ravindra Khanande

Others

खळी

खळी

1 min
305

गालावर खळी

पडे तुझ्या गडे

प्रीत माझी जडे

तुझ्यावर


भिरभिरे केस

भाळावर तुझ्या

डोळ्यांना त्या सजा

उगीचच


गालावर तुझ्या

गुलाबाचे रंग

पाहुनिया दंग

गुलाबही


ओठावर तुझ्या

चांदणे फुलावे

शब्द ते झुलावे

इंद्रधनु


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Ravindra Khanande