वाटे सतत तुला पहावे..😆
वाटे सतत तुला पहावे..😆
कुंतलास या रेशमी
वारा छेडतो उगाची
मोरपंखी स्पर्शाने या
होते काहिली जीवाची
नजरांची चुळबुळ
आड पापणींच्या चाले
कळलेच मला नाही
तुझी रे मी केव्हा झाली ...
गळी विश्वास माळला
कडे करुनी करांचे
गात्र गोठूनी येतात
श्वास गुलाबी सुरांचे
स्पर्श मुक्यानी बोलतो
रोम रोमांस छेडतो
कंप स्पंदनाचे किती
अलवार तो खोलतो
आतुरल्या ओठांस या
सांग कसे आवरावे..??
मला तू की मी तुजला
कोण आधी सावरावे.??
देह वेगळा जरी हा
एक श्वासात वसावे
रोज गुलाबी स्वप्नात
'वाटे तुलाच पाहावे'..!!
एकरूप होता दोघे
सांज गंधळून जावे
चांदण्याची रात धुंद
"गीत प्रणयाचे" गाई.....!..!

