STORYMIRROR

MAHENDRA SONEWANE

Romance

3  

MAHENDRA SONEWANE

Romance

वाट तुझी पाहे

वाट तुझी पाहे

1 min
34

तुझ्या आठवणींच्या बहरात 

फुलासारखे तुला जपले। 

माझ्या हृदयी प्रेम जागवून 

प्राजक्त मनात हळूच लपले॥ 


तुझ्या डोळ्यांची नजर 

पाहिल्यावर झुकली जराशी 

अलगद निसटले स्वप्न 

जे बाळगले उराशी॥ 


तुझ्या निघून गेल्यावर 

एकांतात जगतो मी। 

तुझ्या सहवासाच्या क्षणात 

आजही मनसोक्त रमतो मी॥ 


नदीच्या किनारी दोघं 

पाण्याची निर्मळ धारा।

वाट पाहे कधी एक होतो 

एकटाच वाहतो वारा॥ 


आरक्त तुझे गुलाबी गाल 

केव्हा भेटतील मला। 

बंधन सोडून तू ये ना 

हे सांगतो मी तुला॥


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance