वारकरी
वारकरी
बदललं सारं सरकार, बदलली ती कामे सरकारी
खंड थोडा पडला परी, नाही बदलला वारकरी
आलं संकट अचानक, साथीचे रोग घेऊन जरी
बेरोजगारीचा चाबूक, असा काही बरसला तरी
कुठेही राहूद्या आम्ही, मुखी नाम फक्त हरी
खंड थोडा पडला परी, नाही बदलला वारकरी
पुन्हा तीच जिद्द घेऊनी, पेटून उठला तो सेवेकरी
आस लागली पंढरीची, धाप काय ती कळेना उरी
काय तुझी भक्ती देवा, माया तुझीच आहे सारी
खंड थोडा पडला परी, नाही बदलला वारकरी
पेरणीची ती मना भिती, हलकासा पाऊस बाकी उरला पदरी
कोरड्या बसल्या बैठका साऱ्या, जागा खुप आहे मोकळी सदरी
सारं तूझ्या भरोशी टाकून पांडुरंगा, निघाला आहे तो शेतकरी
तू फक्त वारी होऊन दे विठ्ठला, भेट घेण्या येणारं वारकरी
