ऊब
ऊब

1 min

57
प्रेमाची मिळते ती ऊब
न कोणती उपमा तिज
एक अनोळखी स्पर्श जाणवे
पण वाटते परिपूर्ण मज
मी फक्त एक अजाण
न कोणता गुण न ज्ञान
कोणाची असेल ही योजना
जिथे मला लाभला मान
पाषाणाही फुटे पाझर सखे
मग का मोजू मी फक्त दुःखे
नाते आपुले हे सुंदर इतके
मला वाटे तुझ्या संगतीत अनोखे