क्षण
क्षण


एक नाजूक होता क्षण तो साजण
अनुभवले होते जे परकेपण,
मन घेत होते ठाव तुझा
दाटून आलेला कंठही माझा,
तिमिर असो की असो पहाट
पाहत होते तुझीच वाट,
एक झुळूक यावी हळूच अशी
तुझ्या सोबतीची जाण द्यावी जशी,
अबोला हा काही सुटेना आज
तुला पाहताच येई मला लाज,
किती विरहाचे क्षण अजून
कधी येईन मी आता बहरुन,
घेऊन जा मला तुझ्या समवेत
अन् जावे हे प्राण फक्त तुझ्याच कवेत