Untitled (देशभक्ती)
Untitled (देशभक्ती)
देशभक्ती देशभक्ती
कुठे मिळते का विकत ?
काय मोल, काय भाव
पावात की किलोत ?
ज्याच्या त्याच्या तोंडी असते॥
देशभक्तीचीच बात
प्रत्यक्षात मात्र असते
बोलाची कढी नी बोलायचा भात ॥
देशभक्तीचा आव तसा
सारेच आणत असतात
पण दिसत नाही कधी कुठे
देशभक्ती वागण्यात ॥
नारे असतात देशभक्तीचे
गोड आणि गोजिरवाणे
वेळ आली पाळायची तर
होते पोकळ तुणतुणे ॥
गात असतात सारेच
देशभक्तीचे गाणे
जीवनात मात्र असते
सारेच उणे उणे ॥
देशभक्ती काय एवढी
स्वस्त ती असते
नाही गड्या, ती तर
आपल्या रक्तातच असते ॥
मोठमोठ्याने ओरडून
सांगता येत नसते
लपवतो म्हटल तरी
लपवता येत नसते ॥
जात,धर्म, प्रांताची
वाली ती नसते
ती फक्त आणि फक्त
देशासाठीच असते ॥
देशभक्तीचा बागुलबुवा
उभ करणं सोपं असते
पण देशासाठी जीव देणं
क्रांतिकारकांनाच जमत ॥
म्हणूनच
देशभक्ती मिळत नसते
कधी ती उसण्यात
मुळात ती असावी लागते
आपल्या नसानसांत ॥