STORYMIRROR

Archana Rahurkar

Romance

3  

Archana Rahurkar

Romance

उचकि येते राहून

उचकि येते राहून

1 min
356

आज कोल्हापुरी साज लेऊन,राया थकले वाट पाहून..

दिसं जात मावळतीला मला उचकी येते राहून llधृll


राया तुम्ही याव हो सजना,मज काही आज करमेना

धडधड माझ काळीज करी,कळ आता ही काही सोसंना

राया मज आता राहवेना,जावं एकांतात भेटून

दिसं आज मावळतीला ,मला उचकी येते राहून ll१ll


मुरत हो तुमची ध्यानी मनी,दिसं स्वप्न मज आज लोचणी

लाजेनं चूर चूर झाली काया,तुमच्यासाठीच जीव झुर हा राया

सजना तुम्ही असं येऊन ,जवळी बसाव मज खेटून

दिस आज मावळतीला मला उचकी येते राहून ,ll२ll


नटून थटून मी उभी आहे दारी, नेसले पैठणी हो भरजरी

केला साज शृंगार अदा ही भारी,कधी येईल राया तुमची स्वारी

खोटं रंगवी लाली लाऊन,मोकळ्या केसात गजरा माळून

दिसं आज मावळतीला, मला उचकी येते राहून ll३ll


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance