तू
तू
स्वप्नात अशी माझ्या
येऊन राहली तू...
ठेच उगी मनाला
देऊन राहली तू...
भ्रमरासम डोळ्यांनी
पाहून राहली तू...
अंतरातूनच अंतरातला भेद
घेऊन राहली तू...
वेदना जन्मोजन्मीच्या
सोसून राहली तू...
हळूच गालावरली आसवे
पुसून राहली तू...
