तू पुणे आहेस
तू पुणे आहेस
दगडूशेठच्या दर्शनापासून होई तुझी सुरुवात
निकटच आहेत शनिवार वाड्याच्या, उंच भिंती
प्रेक्षक त्या तुझ्या गौरवाच्या, आजही कालही
नजर वळवता जवळच आहे, मन वेधनारे लाल महाल
गाथा तेथे थोर जिजाऊ शिवाजीची
काई पाऊल चालता पोहोचलेच मी
जणांनी लखलखत्या तुळशीबागेत
पर्वती होती जवळच, ती ही गाठली
तेथून दिसले अनेक विद्यालय महाविद्यालय
वारा तिथला वेगळाच, त्यात ज्ञानाची ग ऊर्जा
वाटेवरी चालता पोहचले, पु. ल. देशपांडेंच्या उद्यानात
त्यांची साहित्यिक थोरवी इतुकी, कौतुकास शब्द नाही
समोर होते विशाल सिंहगड
प्रतिक ते तान्हाजी मालुसरेंच्या दृढ निश्चयाची
पथ घेऊन गेले आम्हास पुढे, हिंजेवडीत
तिथले आयटी उद्योग सज्ज लढा देण्यास जगाला
इथे मॉल पण कमी नाही हो!
आहेत क्रीडा मैदाने देखील,
बघा जरा बालेवाडी दहुंजेकडे
रोज येतात इथे नाव नवीन प्रकल्प,
तयार होतो इमारतींचा पाया,
वाहे इथे भक्तीची ग वरी,
वाहते इथे इंद्रायणी ज्याच्या काठी भेटले तुकारामशिवाजी
इथे पवना धरणही आहे,खडकवासला देखील
इथे देहू आळंदीही आहे, जवड आर्मी कॅन्टोन्मेंट देखील
तू जितका आधुनिक आहेस,
तितकाच संस्कृती जपणारा सुधा
पुणेकरांची तर तऱ्हाच वेगळी
मुढेसुर बोलणे, ऐटच वेगळा
जरी काम करतात जागतिक कंपन्यांमध्ये,
तरी जागे ठेवतात मनामध्येविचार, पेश्र्वांचे संतांचे
ज्या आवडीने खातात बर्गर,
त्याहून दुप्पट उत्साहाने तेवतात आषाढीचा उपास
पुणे तुझी गोष्टच न्यारी
म्हणजे बघ ना,
तू पर्यावरणवादी पण आहेस, सोशलिस्ट सुधा
तू विकसित पण आहेस, निसर्गात वसलेला सुधा
तूला यशाचं वेड पण आहे, जपतो पारंपरिक पद्धती देखील
तू शिक्षित आहे, मायाळू देखील
आजुन किती काय करशील
आता बास कर बाबा, मानले मी
"पुणे तिथे काय उणे"
