STORYMIRROR

Nikita Ganorkar

Abstract Inspirational Others

3  

Nikita Ganorkar

Abstract Inspirational Others

पावसाच्या सरी

पावसाच्या सरी

1 min
211

रिमझिम झिरमिर बरस्ती

पावसाच्या सरी अनावर

कोठे हरवले आभाळ जणांचे

कोठे घरात तळे साचले

कुणाचे हिरवे सपान फुलले

कुणाचे पीक पाण्यात नासले


रिमझिम झिरमिर बरस्ती

पावसाच्या सरी अनावर

कोणाच्या मनात विरहाचे वादळ

कोणाच्या मनात प्रेमाचे पाझर

कोणाच्या मनात निराशेचा वारा

कोणाच्या मनात आशेचा झरा


रिमझिम झिरमिर बरस्ती

पावसाच्या सरी अनावर

कोणी शोधे धुक्यातून वाट

कोणी चाले पंढरीची वाट

कोणी पाहे माऊलीच्या दर्शनाची वाट

कोणी पाहे भाकरीची वाट 


रिमझिम झिरमिर बरस्ती

पावसाच्या सरी अनावर


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract