ती आणि मी
ती आणि मी
मी नेहमी माझाच विचार केला
तरीही साथ सोडली नाही तिने माझी
ती कोरडी होत होती आतून
मी तिला पाणी द्यायचं विसरलो
तिच्यातील जैविक सत्व संपत चालले होते
मी तिची काळजी घ्यायचं विसरलो
ती बोलण्याचा प्रयत्न करत होती
मी कान देऊन ऐकायचं विसरलो
आखेर तिचीही मर्यादा संपली
ती रुसुन बसली माझ्याशी
तिच्यातील ती कुठे तरी हरपून गेली
पानांफुलांरूपी प्रेम ही घेऊन गेली
माझ्यातील मला संपवून गेली
दूरावा वाढला होता खरा
पण प्रेमाचा धागा होता जोडणारा
मी स्वीकारली चूक माझी
वाकलो तिच्यासमोर मी
कारण अहांकारापेक्षा ती महत्त्वाची होती
मी होतो माणूस महत्त्वाकंक्षी
ती जमीन करूणादायी.....
