तू जाताना....
तू जाताना....
तू जाताना..
फक्त बघत होते मी तुला,
आणि अडवायचं राहुनच गेलं
तुला बघण्याच्या नादात,
तू जाताना...
वाटले फिरून येशील मागे,
आणि म्हणशील..चल माझ्यासोबत
काहिही होऊदे राहु सोबत
तू जाताना...
वळलास मागे..
आणि आलास माझ्याजवळ
म्हटलास " काळजी घे, जातो मी"
तू जाताना...
सांगायचं होतं तुला
"जातो" नाही "येतो मी" म्हणावं
पुन्हा भेटण्याची आशा राहते
पण...तू जाताना....
खूप काही सांगायचं राहुनच गेलं
फक्त पाहतच राहिले....हतबलपणे...
तुला जाताना........
