मनात तुझ्या नी माझ्या....
मनात तुझ्या नी माझ्या....
मनात माझ्या तू..
अन् मनात तुझ्या मी..
तरी का कळलेच नाही
तुझ्या मनातले..?
अन् तुला माझ्या मनातले..
जवळ असूनही सरला नाही दुरावा
पण दूर गेल्यावर सहवास वाटला हवा,
जवळी होतास तेव्हा वाटे अजूनही काहितरी उणे
पण दूर गेलास अन् नको झाले जगणे,
तेव्हा उमगले मला माझ्या मनातले
तुच आहेस मनात म्हणून हे सगळे ,
तू म्हणत राहिलास तुच आहेस माझ्या मनात
पण साशंक राहिले मीच काय आहे माझ्या मनात,
कळले आता चातकाला का चंद्राची ओढ आहे..
कारण, मनात माझ्या तूच अन् तुझ्या मनात मीच आहे..

