माझ्यातली मी...
माझ्यातली मी...
1 min
700
असं वाटतंय माझ्यातली मी
कधी कळलीच नाही मला
कशी आहे मी...,
समजलीच नाही मला,
नवरा म्हणतो, तू ऐकूनच घेत नाहिस
माझ्या विरोधातच बोलतेस
अशीच आहेस तू,
सासु म्हणते, सगळं नीट करतेस
पण मनात काहितरी ठेवतेस
अशीच आहेस तू,
मुलगी म्हणते, मलाच ओरडतेस
माझ्या चुकाच शोधतेस
अशीच आहेस तू,
आई म्हणते, नवर्याचंच ऐकतेस
त्याला विरोधच करत नाहीस
अशीच आहेस तू,
पण बाबा म्हणतात, सगळ्यांना समजुन घेतेस
पण काहिच बोलत नाहीस
अशीच आहेस तू,
खरंच सगळ्यांना कळलंय
मी कशी आहे ती
पण मग माझ्यातली मी कशी आहे
हे मलाच कसं कळलं नाही....
अशीच आहे मी....
