तुलाच आता शोधतोय
तुलाच आता शोधतोय
प्रश्नच आहे मनात
असं का वाटतंय ।
मनाने तर स्वीकारले
आता का जागतय ।
जात नाही उचकी
कुणाला आठवतंय ।
गेलास ना तू दूर
तुलाच आता शोधतोय ।
तुझ्याविना शून्य सारे
तुलाही हे कळतंय ।
बंद दाराला कुलूप लागले
जीव इथे तळमळतोय ।
होईल कधी दर्शन
व्याकुळता तुलाच माहितेय ।
हातात तुझ्या आता सारे
दर्शन कधी देणारेय ।