STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Romance

3  

PANKAJKUMAR THOMBARE

Romance

तुझ्याच साठी

तुझ्याच साठी

1 min
153

गगनात दूर तारा जळतो तुझ्याच साठी

सुंदर गुलाब राणी फुलतो तुझ्याच साठी


येना मिठीत माझ्या लाजू नकोस आता

हा गंध मोगऱ्याचा हसतो तुझ्याच साठी


शब्दात काय सांगू प्रीती तुला कळेना

गझलेस वाच माझ्या लिहतो तुझ्याच साठी


युद्धात जीवनाच्या केव्हाच संपलो मी

सर्वस्व हारल्यावर लढतो तुझ्याच साठी


साठीतही तुला मी देईन साथ माझी

आयुष्य फार खडतर जगतो तुझ्याच साठी



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance