तुझ्या नसण्याने
तुझ्या नसण्याने
तुझ्या नसण्यानं माझं काय बिघडतं?
तुझ्याच असण्यानं सारं काही घडतं
तुझ्या असण्यानं दरवळतात दाही दिशा,
हळूहळू चढू लागते मला वेगळीच नशा
कौतुक किती करु मी तुझ्या असण्याचं,
दुःख किती होतं हे तुझ्या नसण्याचं
तुझ्या नसण्यानं माझं काय बिघडतं?
तुझ्याच असण्यानं सारं काही घडतं
प्रकाशाच्या संगतीत थोडा विसर पडतो तुझा,
निशाची चाहूल लागताच वेडावतो जीव माझा
उजेडातच पाहतात स्वप्नं ती तुझी,
निशा मात्र झोपच उडवते माझी
तुझ्या नसण्यानं माझं काय बिघडतं?
तुझ्याच असण्यानं सारं काही घडतं

