तुझं माझं कोड्यातलं गणित
तुझं माझं कोड्यातलं गणित
तुला यायचं तू आलीस
तुला जायचं तू गेलीस
पण बघ ना एकदाच तू
आभाळ दुःखाच पदरात पाडून गेलीस
आता सोडलं बघ मी पण
तुझ्यासाठी रडणं
तुझ्यासाठी झुरणं
कारण मिळत नाही कधीच
जातीला जात अन धर्माला धर्म
एक चूकलं प्रेमाचं पदरात पडलं कर्म
नकोस झालंय सारं काही
पण तुझ्याशिवाय कधी
कधी जगणं जमतं नाही
तुझं माझं कोड्यातलं गणितं
अजून ही सुटलं नाही
कारण तुझं माझं भांडण
अजून ही मिटलं नाही
सूत्रांची जुळवा जुळवं करू पाहतोय
पण देव पण परीक्षा दे म्हणतोय
तुला मला कायमच दूर ठेऊन
कसं जमतं कोणास ठाऊक त्याला ही
आपलं तुटलेलं फुलं केलेली भूल
कधीच निस्तारता आली
नाही त्याला ही मला ही
कारण तुटणार तुटणारच
सुटणार सुटणारच
नजरेचा तिर अन तू धिलेला धीर
तू दिलेली प्रेमाची विषारी खीर
पीत राहीलो जिवंत असतांना
मरत राहिलो तुझं प्रेम नसतांना
आता तरी सुधरशील
माझी होऊ पाहशील
पण नको करुस प्रयत्न
गेलोय आता सारं सोडून
मरणाच्या असह्य वेदना मोडून
कायमच मोकळं केलंय तुला बंधनातून
जा कुठं जायचं तिथं टाहो फोडू नको
तुझं रडणं सहन होणार नाही
पुन्हा यावं लागेल अश्रुंचे थेंब टिपायला
चिरलेल्या काळजाच्या भिंती लिपायला

