तरीही जगणं नसतं सोडायचं ...
तरीही जगणं नसतं सोडायचं ...


आल्या असंख्य लाटा
सर्वकाही घेऊन गेल्या
झाले उध्वस्त जीवन
जगण्याच्या आशाही संपल्या
तरीही जगणं आहेच
आता उरलेल्या आठवणी
त्यानेच जीवन जगायचं
प्रत्येकाच्या आयुष्यात
असं कधीतरी घडायचं
तरी जगणं नसतं सोडायचं