STORYMIRROR

Sheetal Wagh Deshmukh

Romance

4  

Sheetal Wagh Deshmukh

Romance

तो वेडा

तो वेडा

1 min
300

असा कसा रे तू वेडा?

येताना थोड सांगून यावं,

जीवाला घोर लागत नाही ना..

पण तुझं नेहमीचच असं असतं,


मनाला वाटेल तेव्हा तू धो धो येणार,

साऱ्यांना आनंदात भिजवून जाणार..

असा कसा रे तू वेडा?

वेडा म्हणावं की नाही तुला,

तू येतोस तसं सांगून म्हणा,

पण माणूस म्हणलं की दोष तुलाच देणार..

आभाळ भरून येत तरी तू येशील,

की नाही असाही मनात वाटून जात..

पण तू मात्र अचानक येतोस हा नेहमीसारखा,

त्रेधा तिरपीट करून जातो साऱ्यांची..

असा कसा रे तू वेडा?


दोन जीव एकमेकांना भेटायला निघतात,

तू मात्र त्या खास भेटीचा साक्षीदार होऊन जातो,

त्यात त्यांना प्रेमाचा माहोल मात्र करून देतोस,

ते दोन जीव ओले चिंब होतात तुझ्या बरसण्यात,

तू मात्र हा खेळ खोडकरपने पाहत बसतो मात्र..

असा कसा रे तू वेडा?

तुला नेमकी माहिती कशी रे असती,

छत्री विसरली म्हणाल्यावर तू हक्काने येणार,

बिचाऱ्या छत्रीला उचक्या लागत असतील,


एवढी छत्रीची आठवण काढली जाते..

झालेली फजिती मात्र तू निवांत पाहत असतोस..

असा कसा रे तू वेडा?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance