STORYMIRROR

Sheetal Wagh Deshmukh

Others

2  

Sheetal Wagh Deshmukh

Others

रांगोळी

रांगोळी

1 min
53

मेघ दारी आले, डोळे बघुनी शांत झाले,

सरींच्या आधी थेंब, रांगोळी काढून गेले.


थेंब पहिल्या पावसाचा गंध देऊन गेला,

रांगोळीचा आलेख आता वाढता झाला.


थेंब थेंबाने नाचून सारी रांगोळी मांडली,

दारातच उभे राहुनी ती मजा मी अनुभवली.


आता मात्र थेंबाची फौजच वेगाने धडकली,

सारी धरती आता मात्र सुखाने न्हाहून निघाली.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Sheetal Wagh Deshmukh