ती स्वप्नातली
ती स्वप्नातली
ती भेटली एकदा चांदण्यात येऊन
हळुवार दबकत पैंजण हाती घेऊन
मंद वारा अन् सागरी लहरी लाटा
आठवत बसलो मी किनारा होऊन
शिंपल्याची माळ केली तिच्या हौसेची
मिरवली रोमहर्षाने ती गळा घालून
गजरा सुगंधी अतरंगी रातराणीचा
लाजली ती माळता अंग अंग चोरून
गप्पा केल्या आम्ही इकडच्या तिकडच्या
अव्यक्त राहील प्रेम मनातच गदगदून
ती स्वप्नातली भेट परत होईल का प्रत्यक्ष?
रात्र कोजागिरीची जगू प्रेम व्यक्त करून

