पुन्हा काय सांगावे सखी गुपित
पुन्हा काय सांगावे सखी गुपित
पुन्हा पुनः का उठती ह्या लहरी
पुन्हा पुनः का येते तू ह्या नजरी
पुन्हा सूर्य का केशरी ह्या पहरी
पुन्हा रूप का खुलते ह्या चेहरी
पुन्हा सकाळ का असते हसरी
पुन्हा रजनी का असते कहरी
पुन्हा खळाळते तू एका किनारी
पुन्हा मचलतो मी एका किनारी
पुन्हा काय सांगावे सखी गुपित
पुन्हा पुनः काय न कळते तुज

