ती सध्या काय करते
ती सध्या काय करते
कॉलेज संपून माझे चार वर्ष झाली
अलगद मनात मला तिची आठवण आली
विसरून गेलो होतो तिला
पण मन अजूनही झुरते
नेहमीच विचार येतो मनात
ती सध्या काय करते.....
टपोरे टपोरे डोळे तिचे
आणि निखळ हसू
वाटलं नव्हतं एका हास्यात
आपण सहजच फसू
ती चूक अजूनही माझ्या मनात मुरते
नेहमीच विचार येतो मनात
ती सध्या काय करते.....
तिला पाहिलं की दिवस एकदम छान जायचा
भुरळ पडली मनाला याचा अंदाज नसायचा
अचानक दिसली तिच्यासारखी कुणी
अजूनही धडकी भरते
नेहमीच विचार येतो मनात
ती सध्या काय करते.....
सुटत गेलं हातून सगळं
उरलं काहीच नाही
तिला जगायचं होतं मनसोक्त
मला भरारीची घाई
भरारी घेतानाही पंखांना बळ द्यायला कुणीतरी लागते
नेहमीच विचार येतो मनात
ती सध्या काय करते.....
ना सोडून गेलो मी
ना सोडून ती गेली
स्वप्नांनी आमच्या विरहाची
पर्वाच नाही केली
दुरावा मिटवण्यासाठी भेट महत्वाची ठरते
नेहमीच विचार येतो मनात
ती सध्या काय करते.....
वाटलं नव्हतं मला कधीच
दुरावतील रस्ते असे
दूर गेल्यावर ती मला
कसलेच भान नसे
एका कटाक्षासाठी तिच्या अजूनही मन तड़फड़ते
नेहमीच विचार येतो मनात
ती सध्या काय करते.....
कुठे असेल, कशी असेल
प्रश्नांचं वादळ येतं मनात
कधी कधी मन भिजतं आसवांच्या उन्हात
भेटेल का ती पुन्हा मला याची आशा
मनात घर करते
नेहमीच विचार येतो मनात
ती सध्या काय करते.....

