STORYMIRROR

Monika Satote

Others

3  

Monika Satote

Others

जागतील केव्हा?

जागतील केव्हा?

1 min
294

जागली ही अंतरे

जागल्या चहु दिशा 

जागतील केव्हा 

वेड्या मनातील आशा 


झोपल्या मनसोक्त त्या 

पांघरूण मी घातले 

अपयशाच्या आक्रोशाने 

आतातरी जागतील का ??


स्वप्न त्यांची असतील वेडी 

वेड्या माझ्या भावना 

आशेला जागवताना 

मन माझे झोपेल का ??


मनात माझ्या घर त्यांचे 

विश्वही माझ्या मनात 

मनात राहण्याच्या आशेने तरी 

आशा माझ्या जागतील का??


Rate this content
Log in